Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकमध्ये विक्रमी पावसाची नोंद

त्र्यंबकमध्ये विक्रमी पावसाची नोंद

नाशिक । Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यासह ग्रामीण भागात (Rural area) पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील काही गावांचा देखील संपर्क तुटला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) शहरात देखील पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे…

- Advertisement -

काल रात्रभर त्र्यंबकेश्वर शहरात जोरदार पाऊस कोसळल्याने १८२ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे ब्रह्मगिरीकडून (Brahmagiri) आलेल्या पुराच्या पाण्यामुळे (Flood water) त्र्यंबकमधील तेली गल्लीमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून बाजारपेठ जलमय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरासह (trimbak city) आसपासच्या भागातही मुसळधार पाऊस सुरु असून हरसूलमध्ये (Harsul) १४३ तर वेळुंजे (Velunje) भागात १५७ मिलीमीटर पावसाची नोंद (Rainfall record) झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbak taluka) एकूण ४८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या