नांदगाव तालुक्यात रेकॉर्डब्रेक तर मालेगावनेही ओलांडली पावसाची सरासरी

नांदगाव तालुक्यात रेकॉर्डब्रेक तर मालेगावनेही ओलांडली पावसाची सरासरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात सरासरी पाऊस 76 टक्के झाला आहे. यंंदा नांदगाव व मालेगाव तालुक्याने आघाडी घेेतली असुन नादगांव तालुक्याने 133 तर मालेगावने 114 टक्के पावसाची सरासरी ओलांंडली आहे. बाकी तालुके अद्याप 90 टक्क्यांच्या खाालीच आहेत. अजुनही गतवर्षी पेक्षा हा पाऊस 15 टक्के कमीच आहे...

आज नांंदुरमध्यमेश्वरमधुन 505 क्युसेस, वालदेवीतुन 16, कडवातुन 150, हरणबारीतुन 251, नागासाक्यातुन 636 क्युसेस पाणी सोडले जात आहेे. गंंगापुर 92 टक्के भरले आहे. पालखेड 89,टक्के, चणकापुर 90 टक्के, दारणा 95 टक्के भरले आहे.

नाशिकमध्ये आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. अधुन-मधुन तुरळक पाऊस पडत आहे. तर सूर्यदर्शनही मध्येच होत असल्याने ऊन पावसाचा खेळ नाशिककर अनुभवत आहेत.

गेल्या 24 तासात तालुका निहाय पडलेला पाऊस मिलीमिटर मध्ये असा
नाशिक 16

इगतपुरी 29

पेठ 46

नांदगाव 123

चांदवड 17

त्र्यंबकेश्वर 22

सुरगाणा 69

निफाड 53

बागलाण 46

मालेगाव 33

येवला 51

सिन्नर 54

देवळा 15

कळवण 33

इतका पाऊस झाला. गत वर्षी याच दिवसापर्यंंत 91.90 ट्क्के पाऊस झाला होता. तो यंदा 76 ट्क्क्यांवर आला आहे. मालेगाव तालुक्यात 114 ,इगतपुरी 80, सुरगाणा 83, बागलाण 81, सिन्नर 73, येवला 71, नांंदगाव 133 टक्के पाऊस झाला आहे. नाशिकला 44 व चांदवडला 39 ट्क्के पाऊस झाला आहे. काल एकाच दिवसात जिल्ह्या्ात 628 मिलीमीटर पाऊस झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com