सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना

अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती
सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी(Maharashtra-Karnataka border issue) गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्र्चना करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यसभा सदस्य शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सांवत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार राजेश क्षीरसागर आदींचा या समितीमध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com