Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचे आमदार गोव्याहून मुंबईकडे रवाना

शिंदे गटाचे आमदार गोव्याहून मुंबईकडे रवाना

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील (goa) हॉटेल ताज (hotel taj) कन्वेशनमध्ये मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे गटाचे (shinde group) आमदार गोव्याहून मुंबईकडे (mumbai) रवाना झाले आहेत. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ते मुंबईत पोहोचणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे…

- Advertisement -

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या ३५ हून अधिक व काही अपक्ष आमदारासंह (Independent MLA) बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या पाठींब्याने त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची (cm post) शपथ घेतली होती. शिंदेंच्या शपथविधीनंतर या बंडखोर आमदारांनी (rebel mla) टेबलवर उभे रहात डान्स केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच या आमदारांना मुंबई विमानतळावरून हॉटेलमध्ये नेण्यासाठी तीन मोठ्या लक्झरी बसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या (shivsena) आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केली होती. काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता हे सर्व आमदार मुंबईत दाखल होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस तैनात केले गेले असून केंद्राची देखील विशेष सुरक्षा त्यांना पुरविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या