चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम; आमदार संजय शिरसाटांचा घणाघात

चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम; आमदार संजय शिरसाटांचा घणाघात

मुंबई । Mumbai

औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या (Vadgaon Kolhati Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल (Election results) नुकताच लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला (Shinde Group) बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात वादाला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी उमेदवार पळवले.या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता...

चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत चद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. तसेच निवडणुकीत ज्याचा विजय होतो, तो नम्रपणे स्वीकारणे आवश्यक आहे. जे उमेदवार ग्रामपंचायतमध्ये निवडून आले त्यांचे सुरुवातीपासूनचे नेतृत्व आपणच करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाची पराभवाला सुरुवात, असे सगळीकडे म्हटले गेले असते. आता जे उमेदवार निवडून आले आहेत. ते पूर्वीसुद्धा सदस्य होते, त्यांचे नेतृत्व मीच करत होतो. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास ४० हजार मतदार आहेत. या ४० हजार मतदारांनी आम्हाला बहुमत दिले आहे, याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर आम्हीही याचा स्वीकार केला असता,असेही शिरसाट म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com