Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती

लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

भारतातील लसीकरण मोहिमेत Vaccination Camaign मध्यंतरी लसटंचाईचे अडथळे आले. मात्र त्यावर मात करून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. अलीकडेच देशाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर लसीकरण मोहिमेने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. देशात पात्र लोकसंख्येपैकी निम्म्या नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Union Ministry of Health ट्वीट करून ही बातमी दिली.

- Advertisement -

आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशात आतापर्यंत 127.61 कोटींहून अधिक नागरिकांना लसमात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 1,04,18,707 नागरिकांना लस देण्यात आली.

’पात्र लोकसंख्येपैकी 50 टक्क्यांहून अधिक नागरिक आता पूर्णपणे लसवंत झाले आहेत. आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. करोनाविरुद्धची लढाई आपण एकत्र जिंकू, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. देशात करोनाविरुद्ध 100 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.

यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने शनिवारी दावा केला आहे. राज्यात तब्बल 53,86,393 पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र 100 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या