पालकमंत्र्यांची फेररचना? भाजपचा पुढाकार; नाशिकला भुजबळ-महाजन यांच्यात रस्सीखेच

पालकमंत्र्यांची फेररचना? भाजपचा पुढाकार; नाशिकला भुजबळ-महाजन यांच्यात रस्सीखेच

नाशिक | फारुक पठाण | Nashik

भाजप-शिवसेना महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेला अजित पवार गट सामील झाल्यानंतर त्या गटाच्या नऊ आमदारांना मंत्रीपदे मिळाली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिनचे झाले आहे. त्यामुळे मंत्रीपदाचे वाटपदेखील तीन पक्षांत झाले. आता अजित पवार गटाच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद देणे बाकी आहे. लवकरच राज्यातील पालकमंत्र्यांच्या यादीची फेररचना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यासाठी मुंबईत खलबत्ते सुरू झाले असून लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजप नव्याने पालकमंत्री नियुक्त करण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद घेण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे.

पालकमंत्र्यांची फेररचना? भाजपचा पुढाकार; नाशिकला भुजबळ-महाजन यांच्यात रस्सीखेच
VIDEO : नांदेड रुग्णालयातील मृत्यूंवर CM शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले, “औषधांची, डॉक्टरांची कमतरता...”

राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्याबरोबरच राज्यातील सर्व पालकमंत्र्यांचे फेरनियोजन करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे समजते. पालकमंत्री मैदानात राहिले तर कार्यकर्त्यांसह प्रशासनावर त्यांची पकड असते.

म्हणूनच येत्या काही दिवसांत पालकमंत्र्यांची नव्याने यादी तयार करण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचे पालकमंत्री शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या जागी नवीन चेहरा देण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांची फेररचना? भाजपचा पुढाकार; नाशिकला भुजबळ-महाजन यांच्यात रस्सीखेच
'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीकडून नाशिकची जागा छगन भुजबळ यांच्यासाठी मागण्यात आली आहे तर पुण्याची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मागण्यात येत आहे, असे समजते. दादा भुसे सध्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्यासह छगन भुजबळ, गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची नावे नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. महायुतीचा त्याबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्र्यांची फेररचना? भाजपचा पुढाकार; नाशिकला भुजबळ-महाजन यांच्यात रस्सीखेच
Video : त्र्यंबकेश्वरला बिबट्या जेरबंद
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com