Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभारत-चीन सीमा वादाबाबत राजनाथसिंह यांची महत्वाची घोषणा

भारत-चीन सीमा वादाबाबत राजनाथसिंह यांची महत्वाची घोषणा

नवी दिल्ली

भारत-चीन दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून सीमारेषेसंर्दभात (LAC) वाद सुरु आहे. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली.

- Advertisement -

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काल जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज संसदेत लडाखमधील स्थिती संदर्भात माहिती दिली. राजनाथसिंह म्हणाले, “चीन बरोबर झालेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीचा निर्णय झाला आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल. काही प्रश्नांवर वाद सुरु आहे. परंतु ते ही चर्चेतून सुटतील” असे राजनाथ यांनी सांगितले. दोन्ही बाजू पद्धतशीरपणे फॉरवर्ड बेसवरुन माघार घेतील. मुत्सद्दी पातळीवर ठरल्यानंतर दोन्ही देश पुन्हा गस्त सुरु करतील असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काहीच गमावले नाही

सीमावादात भारतील लष्कराने सर्व आव्हानांचा आक्रमक पद्धती सामना केला. या दोन्ही चर्चेत आपण काहीच गमावले नाही. सीमावादासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकवेळा भूमिका स्पष्ट केली आहे. आपली एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही.

चीनचा दावा, LAC वरील वाद संपला

संरक्षण मंत्र्यांच्या राज्यसभेतील वक्तव्यापूर्वी बुधवारी चीनच्या सरकारने दावा केला होता की, लडाखमध्ये LAC वर भारतासोबत नऊ महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपला आहे. बुधवारी दोन्ही देशाकडून एकसोबतच माघार घेण्यास सुरुवात झाली आहे.

10 वी बैठक लवकरच होणार

चीनच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेंसचे प्रवक्ते वू कियानने सांगितला की, चीन आणि भारतादरम्यान झालेल्या कमांडर लेव्हलच्या 9 व्या बैठकीत डिसइंगेजमेंटवर एकमत झाले होते. या अंतर्गत दोन्ही देशाने पँगॉन्ग हुनान आणि नॉर्थ कोस्टवरुन आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या