Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्या'आरटीई' प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

‘आरटीई’ प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यात करोनामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे.

- Advertisement -

त्यापार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने सलग दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांर्गत राज्यातील 9 हजार 331 खासगी शाळांमधील 1 लाख 15 हजार 477 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. लॉटरीत निवड झालेल्या 68 हजार 289 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्यापही 32 हजार 637 जागा रिक्त आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.23) सायंकाळपर्यंत 3 हजार 685 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, 1 हजार 622 जागा शिल्लक आहेत.

दरम्यान, शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाणार आहे. मात्र, पालकांना फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता वेळोवेळी चौकशी करावी लागणार आहे. तसेच पालकांनी शाळेत प्रवेश निश्चितीसाठी गर्दी करू नये, आणि प्रवेशासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या