Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम; तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान (हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी) सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, अशा पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.

मात्र, सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे; तसेच शासकीय कार्यालयांमधून दाखले मिळवण्यासाठी विलंब होत आहे. प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे डीटीईने अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून दिली आहे.

30 सप्टेंबरनंतर ई-स्क्रुटनीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जाणार आहेत. दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी 3 ऑक्टोबर रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या