भारतात Sputnik V लसींची निर्मिती सुरु : १० कोटी डोस बनणार


भारतात Sputnik V लसींची निर्मिती सुरु : १० कोटी डोस बनणार

नवी दिल्ली

कोरोना लसींची कमतरता असतांना चांगली बातमी आली आहे. रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. भारतातील पॅनेसिया बायोटेक आता दरवर्षी स्पुत्निक-व्ही लसीचे १० कोटी डोस उत्पादन करणार आहे.

आरडीआयएफचे सीईओ किरिल दिमित्रीदेव यांनी याचे स्वागत केले आहे. पॅनेसिया बायोटेकमध्ये स्पुतनिक व्ही लसीचे उत्पादन सुरु होणे हे भारतात कोरोना महामारीविरोधातील एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पॅनेसिया बायोटेकच्या भागीदारीत भारतात उत्पादन सुरू केल्याने देशाला साथीच्या रोगाचा सामना करण्यास मदत करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

रशियाची ही लस पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये वेगवेगळे एडेनोव्हायरसचा वापर केला जातो. ही लस 65 देशांमध्ये रजिस्टर झाली असून ही लस कोरोनावर 91.6 टक्के परिणामकारक आहे. भारतात Sputnik V लसीची निर्मिती करण्यासाठी हेरो, ग्लँड फार्मा आणि स्टीलिस बायोफर्मा या अन्य भारतीय फर्मा कंपन्यांशी भागीदारी केली आहे.


भारतात Sputnik V लसींची निर्मिती सुरु : १० कोटी डोस बनणार
काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर भारतात आता हे नवीन संकट
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com