दोन हजारांच्या नोटा बदलण्याबाबत SBI चे 'असे' आहेत निर्देश

दोन हजारांच्या नोटा बदलण्याबाबत SBI चे 'असे' आहेत निर्देश

मुंबई | Mumbai

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरनंतर २ हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नक्की कशा प्रकारे या नोटा बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत २ हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत RBI हळूहळू बाजारातून २ हजारांच्या नोटा काढून घेईल.

दरम्यान, नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं एसबीआयनं (SBI Bank) सांगितलं असून एसबीआयने आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. तसेच स्टेट बॅंकेसोबत इतर बँका देखील या नियमाचे पालन करतील अशी माहिती आता मिळत आहे.

दोन हजाराच्या नोटा २३ मे पासून बँकांमध्ये बदलण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी दोन दिवसाचा अवधी राहीला असून बँकांनी तयारी सुरू केली आहे. बँकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी फक्त बँकिंग नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे आरबीआय बँकेने म्हटले आहे.

दोन हजारांच्या नोटा बदलण्याबाबत SBI चे 'असे' आहेत निर्देश
आगामी निवडणुकांबाबत प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते लोक २००० रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत का? तर, आरबीआयने यासाठीही व्यवस्था केली आहे आणि आपल्या निर्णयात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील बँकेत जाऊन २०,००० रुपयांपर्यंतच्या २००० च्या नोटा एकावेळी बदलू शकतात.

बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला बदलून मिळणार नोटा

ग्रामीण भागात राहणारे लोक बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला भेट देऊन २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात. मात्र केंद्रावर फक्त २ हजार रुपयांच्या दोन नोटा म्हणजेच ४ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येतील. बिझनेस करस्पॉन्डंट बँकेसारखे काम करतात. ते गावकऱ्यांना बँक खाती उघडण्यास मदत करतात. ते बँकेचे छोटे-मोठे व्यवहारही करतात.

दोन हजारांच्या नोटा बदलण्याबाबत SBI चे 'असे' आहेत निर्देश
“जाती धर्माच्या माध्यमातून...”; दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल

दोन हजारांच्या नोटा बदलण्याबाबत SBI चे 'असे' आहेत निर्देश

१) २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येतील.

२) ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरीक २ हजार रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

३) बँकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.

४) आरबीआयच्या १९ शाखांमध्येही नोटा बदलता येतील.

५) एकूण रक्कम एकावेळी २० हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

६) आरबीआयने बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com