Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार

नवी दिल्ली | New Delhi

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, आज रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक काढत नागरिकांना (citizens) त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेने नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी उद्यापासून दोन हजार रुपयांच्या नोटा (Rs.2000 notes) नागरिकांना व्यवहारात वापरता येणार नाहीत...

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार
Aaditya Thackeray : "यह डर अच्छा है" असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोटा (Note) बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला असून ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विद्यमान प्रणाली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हटले होते. तसेच आरबीआयने यंदा १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये (Bank) जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार
Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; 'या' विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

तसेच रिझर्व्‍ह बँकेने सप्टेंबर (Month of September) महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, रद्द केलेल्या दोन हजार रुपयांच्या चलनातील एकूण नोटांपैकी आतापर्यंत सुमारे ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. रिझर्व्‍ह बँकेने दोन हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या आपल्या खात्यात भरण्याची किंवा बँकांतून त्या बदलून घेण्याची सुविधा नागरिकांना दिली होती. ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. आज पुन्हा मुदत वाढवून ७ ऑक्टोबर करण्यात आली. तर ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३.३२ लाख कोटी रुपये मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या होत्या. यानंतर आता ७ तारखेनंतर बँकेकडे संपूर्ण किती नोटा आल्या हे समजणार आहे.

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार
Asian Games 2023 : रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीचा चीनमध्ये जलवा; टेनिसमध्ये भारताला मिळाले 'गोल्ड मेडल'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्याजागी नव्या पॅटर्नमध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, २०१८-१९ पासून रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली होती. तर २०२१-२२ मध्ये ३८ कोटी २००० रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या होत्या. यानंतर १९ मे २०२३ रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत बँकेत भरता येणार
Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com