2000 च्या नोटबंदीनंतर RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शशिकांत दास
शशिकांत दास

मुंबई | Mumbai

आरबीआयकडून (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नागरिकांना आवाहन करताना 2 हजार च्या नोटा बदलण्यासाठी बॅंकेमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. सध्या या नोटा चलनातून मागे घेण्यात आल्या असल्या तरीही वैध चलन आहे. अजून 4 महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबर पर्यंत नागरिक 2000 ची नोट बदलून घेऊ शकतात. त्यासाठी मुबलक पर्यायी नोटा देखील छापून तयार असल्याचा दावा दास यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय झाला असला तरीही या नोटा अनेक दुकानदार घेण्यास नकार देत आहेत. दरम्यान दास यांनी दुकानदारांनाही आवाहन केले आहे की नोटा स्वीकारणं टाळू नका. वेळच्या वेळी अशाप्रकारे नोटा चलनातून बाहेर काढल्या जातात पण चलन वैध असल्याने कोणाची गैरसोय होणार नसल्याची काळजी घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 4-5 वर्षांपूर्वी छापण्यात आलेल्या या 2000 च्या नोटांचा उद्देश आता सफल झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतात. नोटा बदलून घेण्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती समोर येत आहे, त्यामुळे स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी आवश्यक असेल आणि फॉर्मही भरावा लागेल, असे सांगण्यात येत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com