Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘सीमा’च्या अध्यक्षपदी राठी; उपाध्यक्षपदी भंडारी

‘सीमा’च्या अध्यक्षपदी राठी; उपाध्यक्षपदी भंडारी

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

औद्योगिक वसाहतीतील (Industrial estates) उद्योजकांच्या विकासासाठी (Development of entrepreneurs) व पायाभूत समस्यांचे तत्काळ निरसन होण्याच्यादृष्टीने

- Advertisement -

सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स अससोसिएशन (Sinner Industrial and Manufacturers Association) (SIMA) (सीमा) ची नुकतीच स्थापना करण्यात आली असून असोसिएशनच्या अध्यक्षपदी किशोर राठी (Kishore Rathi as President), उपाध्यक्षपदी किरण भंडारी (Kiran Bhandari as Vice President), सचिवपदी बबन वाजे, खजिनदारपदी राहुल नवले यांची निवड करण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यात (sinnar taluka) दोन औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतीतील अनेक मोठ्या उद्योगांसमवेत लहान उद्योग विकासाच्या दृष्टीने मागील 20 वर्षांपासून कार्यरत असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या व नवीन उद्योजकांना उद्योजक होण्याची संधी मिळाली आहे. उद्योग सुरु करताना व उद्योग चालू ठेवतांना उद्योजकाला भांडवल, शासकीय मंजुरी ते त्यांचे पेमेंट मिळण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

त्याचबरोबर त्यास आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा (infrastructure) वेळेवर मिळत नसल्यामुळे उद्योजकांसमोर अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यास आवश्यक असलेली मदत तत्काळ मिळण्यासाठी या असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योजकांच्या समस्या 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. सिन्नरच्या (sinnar) उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक संस्था अस्तित्वात नसल्यामुळे मुसळगाव व माळेगांव वसाहतीतील उद्योजक एकत्र येत असोसिएशन (सीमा)ची स्थापना करण्यात आल्याचे उद्योजक अरुण चव्हाणके (Entrepreneur Arun Chavanke) यांनी सांगीतले.

संघटनेमुळे शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींशी तत्काळ संपर्क साधून उद्योजकांचे प्रश्न व वसाहतीच्या विकासाच्या दृष्टीने कामे करता येऊ शकतात याची माहिती देत त्यांनी स्थानिक औद्योगिक संघटनेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी असोसिएशनची कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यात राठी, भंडारी, वाजे, नवले , यांच्यासह सचिवपदी दत्ता ढोबळे व सहखजिनदारपदी रतन पडवळ यांची निवड करण्यात आली.

तसेच संचालकपदी किरण बडगुजर, हेमंत नाईक, लक्ष्मण डोळे, अजिंक्य पाध्ये, अनिल कदम, सुधीर जोशी, विनायक बेडीस, मुकेश देशमुख, रोमित पटेल, निलेश काकड, नारायण क्षीरसागर व शांताराम दारुंटे यांची निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळात मारुती कुलकर्णी, अरुण चव्हाणके, एस. के. नायर, किरण वाजे, कृष्णा नाईकवाडी, व अतुल अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी किरण वाघ, जयवंत काळे, नवनाथ नागरे, ज्ञानेश्वर भागवत, बाबासाहेब हारदे, मिलिंद इंगळे, भूषण क्षत्रिय यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या