Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई-आग्रा महामार्गावर 'रास्ता रोको'; महावितरण विरोधात भाजप आक्रमक

मुंबई-आग्रा महामार्गावर ‘रास्ता रोको’; महावितरण विरोधात भाजप आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

विजेचा लपंडाव, रात्रीच्या वेळी वीज देणे यामुळे हैराण (load shedding mseb) झालेल्या शेतकऱ्यांना आता जळालेले रोहित्र (DP) बदलवून मिळण्यासाठी महावितरणच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. मोठा खर्च करून पिकांची लागवड केलेली असताना चांदवड तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या कारभाराला कंटाळले आहेत…(bjp agitation against mseb works in chandwad taluka)

- Advertisement -

भाजपच्या वतीने तब्बल दोन तास चांदवडमध्ये चक्काजाम (Chakkajam agitation at Chandwad) आंदोलन छेडण्यात आले. चांदवड देवळा (Chandwad Deola) विधानसभा मतदारसंघाचे डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांच्या नेतृत्वात मुंबई आग्रा महामार्गावर हे आंदोलन झाले.

नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलून मिळावे, महावितरणकडून सुरू असलेली वीज तोडणी तातडीने थांबवावी अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. यावेळी महामार्गावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर उभे करत वाहतूक ठप्प केली.

यावेळी डॉ. राहुल आहेर यांच्यासमवेत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा

आंदोलन सुरु असतानाच एक रुग्णवाहिका मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे रुग्णाला घेऊन निघाली होती. यावेळी आंदोलकांनी या रुग्णवाहिकेला मार्ग करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या