
पुणे । प्रतिनिधी Pune
फोन टॅपिंग प्रकरणी (case of phone tapping )पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला ( Former Pune Commissioner Rashmi Shukla)यांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचा न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे.
दरम्यान, तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी शुक्ला यांनीच आम्हाला फोन टॅपिंग करायला लावले होते असा डहाणे यांनी चौकशीच्या दरम्यान खुलासा केला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप होता. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
नुकताच न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. यामुळे आता शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट कशी दिली गेली, यावरुन हिवाळी अधिवेशनात वाद निर्माण झाला आहे.