
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चोख पोलीस (Police) बंदोबस्त, नाका-बंदी व गाड्यांची तपासणी यामुळे नाशिक शहरात (Nashik City) रंगपंचमी (Rangpanchami) उत्साहात मात्र शांततेत साजरी करण्यात आली. आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर एकही गुन्ह्याची नोंद झाली नाही...
पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पारंपारिक वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली होती. डीजे वाजवण्यास परवानगी नसल्यामुळे नाशिककरांचा हिरमोड झाला होता.
मात्र रहाडीला (Rahad) परवानगी देण्यात आल्याने नाशिककरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे नाशिककरांना डीजेचा विसर पडल्याचे दिसून आले.
पारंपरिक वाद्यांच्या म्हणजेच ढोल ताशांच्या गजरात नाशिककर आनंद घेत असताना पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. तसेच पोलिसांतर्फे वाहनांची तपासणीदेखील सुरू होती.
एकंदरीत पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण शहरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने नाशिककरांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.