Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याभूमाफिया रम्मी राजपूतला हिमाचल प्रदेश मध्ये बेड्या

भूमाफिया रम्मी राजपूतला हिमाचल प्रदेश मध्ये बेड्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात भूमाफियांच्या टोळीचा म्होरक्या व आनंदवली येथील वृध्द भूधारक खुन प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फरार रम्मी राजपूत यास नाशिक पोलिसांनी(nashik police) हिमाचल प्रदेशमध्ये (himachal pradesh) ताब्यात घेतले. त्याला नाशिकमध्ये आणण्यात येत आहे….

- Advertisement -

राजपूत याच्याविरुध्द मोक्काअन्वये पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यास फरार घोषित केले होते.तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. (Nashik district court) आनंदवली (anandwalli) येथे फेब्रुवारी महिन्यात रमेश वाळू मंडलिक वृध्द भूधारकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा भूमाफियांच्या टोळीविरुध्द दाखल करण्यात आला होता. यामुळे या खुनामागे भूमाफियांचा हात असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण १२ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पाण्डेय यांनी या गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असणारे तसेच टोळीला मदत करणाऱ्या सर्व संशयितांविरुध्द मकोका कायद्यानुसार कारवाई करत प्रस्ताव पोलीस महासंचालकांसह उच्च न्यायालयाला पाठविला होता.

न्यायालयास अपर महासंचालकांनीदेखील या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या गुन्ह्यात राजपूत हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तेव्हापासून पोलिसांकडून विविध पथके ठिकठिकाणी रवाना करत राजपूतचा माग काढला जात होता.

तांत्रिकविश्लेषण शाखेचीही मदत यासाठी पोलिसांच्या पथकांकडून घेतली जात होती.नेटवर्क मधील मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीवरून पोलिसांच्या पथकाने हिमाचल प्रदेश गाठून तेथे सापळा रचत शिताफीने रम्मी राजपूत ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या