रम्मी राजपूतसह बंधू जिम्मी पोलीस कोठडीत

रम्मी राजपूतसह बंधू जिम्मी पोलीस कोठडीत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील आनंदवलीतील एका वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भुमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. यामध्ये रम्मी परमजितसिंग राजपुत व जिम्मी परमजितसिंग राजपुत या दोघांची नावे पुढे आली. हे दोघेही संशयित आरोपी फरार होते. गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने त्यांना अटक करुन नाशिकला आणले. आज दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील गुरुवारपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे....

अधिक माहिती अशी की, टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत (Rammi Rajput), सचिन त्र्यंबक मंडलिक (Sachin Mandlik), बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हेसह २० जणांच्या टोळीवर मोक्काअन्वये पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती.

तसेच जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यास फरार घोषित केले होते.तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. न्यायालयास अपर महासंचालकांनीदेखील या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या गुन्ह्यात राजपूत हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तेव्हापासून पोलिसांकडून विविध पथके ठिकठिकाणी रवाना करत राजपूतचा माग काढला जात होता.

सहा पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस अंमलदार येवाजी महाले, प्रशांत मरकड, महेश साळुंके, निलेश पवार यांच्या पथकाने चंदीगड, अमृतसर, हरियाणा आदी परिसरात सातत्याने शोध घेतला. शोधकार्य दरम्यान जिम्मी राजपूत हा उत्तराखंड येथील रामनगर परिसरात आढळून आल्यावर त्यास शिताफीने अटक करण्यात आली.

त्याची चौकशी करून फरार आरोपी रम्मी हा हिमाचल प्रदेश येथील जंगल परिसरात असलेल्या राणी ताला या भागात त्यास अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.