शिवसेनाचा हा नेता लवकरच करणार गौप्यस्फोट
शिवसेना

शिवसेनाचा हा नेता लवकरच करणार गौप्यस्फोट

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे (Viral audio clip) क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. या घटनेनंतर रामदास कदम यांचे विधान परिषदेचे तिकीटही कापण्यात आले.

शिवसेना
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

बुधवारी रामदास कदम हे शक्तीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी रामदास कदम म्हणाले, मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेबांमुळेच. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. मी कडवा शिवसैनिक आहे. शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे, गौप्यस्फोट करणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना माहिती पुरवल्याच्या आरोप कदम यांच्यांवर आहे. रामदास कदम हे सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्याच महिन्यात संपणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी दिली गेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com