Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशराम मंदिरामुळे अर्थविश्व बदलेल

राम मंदिरामुळे अर्थविश्व बदलेल

अयोध्या

इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. श्रीरामांना खारीसहीत वानर, वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीने दलित, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गाने स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती. त्याच पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे. यामुळे अयोध्येचे अर्थविश्वही बदलेल. संपूर्ण जगातून लोक येथे येतील. येथे नव्या संधी मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित केले. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली.

मोदी म्हणाले की, येथे येणे स्वाभाविक होते. कारण राम काज कीजे बिना मोहि कहां विश्राम. भारत आज भगवान भास्करच्या सानिध्यात शरयू किनारी एक सुवर्ण अध्याय रचत आहे. सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयापासून सारनाथपर्यंत, अमृतसरपासून पाटणा साहिबपर्यंत, लक्षद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आहे.

तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंगांचे किंवा राम कथांचे वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितले जाते. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देशात राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत. जगातील अनेक देश रामाचे नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत.

३० वर्षाच्या संघर्षाचे हे फळ

- Advertisment -

ताज्या बातम्या