रक्षा-बंधन : राजकारणातील भाऊ-बहिणीच्या या जोड्या


रक्षा-बंधन : राजकारणातील भाऊ-बहिणीच्या या जोड्या
रक्षा-बंधन

बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. (Raksha Bandhan) आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाचे संकट असतांनाही बहिण-भावाचा हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे. बहिण-भावांमधील स्नेह, आदर व प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भाऊ-बहिणीचं भावनिक राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राजकारणातील भाऊ-बहीण या विषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

राहुल गांधी-प्रियांका गांधी
राहुल गांधी-प्रियांका गांधी

राहुल गांधी-प्रियांका गांधी

माजी पंतप्रधीन राजीव गांधी व सोनीया गांधीचा मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियांका गांधी (rahul and priyanka gandhi)हे दोन्ही देशाच्या राजकारणात गेली अनेक सक्रीय आहे. या भावा- बहिणीच्या या जोडीमुळे सोनिया गांधीनंतर देशातील राजकारण या जोडीमुळे गांधी कुटुंबाभोवती केंद्रीत राहिलेलं आहे.

अजित पवार-सुप्रिया सुळे
अजित पवार-सुप्रिया सुळे

अजित पवार-सुप्रिया सुळे

शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार(ajit pawar and supriya sule) हे चुलत बहिण-भाऊ आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तर सुप्रिया सुळे खासदार आहे. अधुनमधून सुप्रिया राज्यातील राजकारणात येणार असल्याचा अफवा पसरवल्या जातात या बातम्यांमुळे अजित पवार अस्वस्थ होत असतात. या बातम्यांचा परिणाम म्हणूनच शरद पवारांना सोडून अजित पवार काही तासांसाठी भाजपला जाऊन मिळाल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले होते.

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे
धनंजय मुंडे-पंकजा मुंडेPraveen Wankhade

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे (dhananjay munde and pankaja munde)हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत धनंजय यांनी पंकजा यांच्या भाजपच्या लाटेतही पराभव केल्याने दोघांमधील राजकीय वैर अधिक धारधार झाले… एकमेकांशी अबोला धरण्यापर्यंत मजला गेल्या. अर्थात सणवाराच्या वेळी रक्षा बंधन, भाऊबीज असे सणही एकत्र आणणारे ठरले पण ते तेवढ्यापुरतेच… राजकीय वैरभावना तीव्र आणि कायमच आहे. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.

बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे
बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे

बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे (balasaheb thorat and durga tambe)ही सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची भावा-बहिणींची जोडी आहे. सध्या बाळासाहेब थोरात संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर त्यांच्या बहीण दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांचे पती सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आहेत. दुर्गा आणि सुधीर यांचे पुत्र सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

अवधूत तटकरे-आदिती तटकरे
अवधूत तटकरे-आदिती तटकरे

अवधूत तटकरे-आदिती तटकरे

तटकरे कुटुंबात अवधूत व आदिती (avadhut tatkare and aditya thackeray)हे राजकारणातले भाऊ-बहीण पाहायला मिळतात. तटकरे कुटुंबीयांमध्ये अनील तटकरे आणि सुनील तटकरे असे दोन बंधू. अनिल हे मोठे तर सुनील हे लहान भाऊ आहेत. सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com