Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील - मंत्री छगन भुजबळ

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील – मंत्री छगन भुजबळ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi ) चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून ( Rajysabha Election )येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही (Legislative Councils)आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal)यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

- Advertisement -

विधान परिषद उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्याला संधी दिली तर संधीचे सोने करीन असे विधान भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते.

पण भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली नाही. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, त्यांना डावलण्यात आले आहे. वास्तविक त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरवता आले असते, त्यांना संधी द्यायला हवी होती. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतले जाईल वाटले होते. परंतु असे काही झाले नाही. याचा परिणाम हा लोकांवर आणि समाजावरही होत असतो, असे छगन भुजबळ म्हणाले.

घोडेबाजाराला बळी पडणार नाहीत

राज्यसभा असो अथवा विधानपरिषद निवडणूक असो, निवडणुकीतील घोडेबाजाराला महाविकास आघाडीचे कोणीही आमदार कोणी बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील, असे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या