Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्या'मविआ'ला धक्का! भाजपाचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार पराभूत

‘मविआ’ला धक्का! भाजपाचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार पराभूत

मुंबई | Mumbai

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. दरम्यान सहाव्या जागेची उमेदवारी, अपक्षांच्या डरकाळ्या आणि तीन मतांवरून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत रात्री उशिरापर्यंत खोळंबलेली मतमोजणी अशी नाट्यमय….

- Advertisement -

वळणे घेत रंगलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत आपला तिसरा उमेदवार अर्थात धनंजय महाडिक यांना निवडून आणले. महाआघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित शक्तीच्या जिवावर मैदानात उतरलेले शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.

संजय पवार यांच्याकडे पहिल्या पसंतीच्या ३३ मतांची आघाडी होती. तर महाडीक यांना २७ मते होती. मात्र, दुसऱ्या पंसतीच्या मतांमध्ये १४ मतांची आघाडी घेतली. तर संजय पवार यांना दुसऱ्या पंसतीचा एकही मत न मिळाल्याने पवार यांचा महाडीक यांनी दारुण पराभव केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या