राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक

राज्यसभेसाठी मतदान करण्याबाबत आमदारांनाही मार्गदर्शन
राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यसभेची निवडणुक ( Rajyasabha Elections ) चार दिवसावर आल्याने महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aaghadi )प्रमुख तीनही पक्षांनी आपल्या आमदारांना ( Mahavikas Aaghadi MLA's) मुंबईत बोलावून घेतले आहे. आज, मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे महाविकास आघाडी आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीत आघाडीच्या आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मतदान करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याआधी ४ वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राज्यसभा निवडणूक प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांची उपस्थिती असणार आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे. सहा जागेसाठी ७ उमेदवार असल्याने महाविकास आघाडी विरूद्ध भाजपमध्ये रस्सीखेच आहे. दोन्ही बाजूनी विजयाचे दावे केले जात आहे. भाजपने अपक्ष आणि छोट्या पक्षांशी बोलणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनाही चुचकारण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सावध झाली असून, सर्व पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. आमदारांना मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यसभेसाठी पसंतीक्रमाने मतदान केले जाते. विधानसभेतील निम्म्याहून अधिक आमदार प्रथमच राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना मंगळवार दुपारपर्यंत मुंबईत दाखल होण्याच्या सूचना आहेत. खासदार विनायक राऊत यांना आमदारांशी समन्वय आणि संपर्क ठेवण्याच्या सूचना शिवसेनेकडून दिल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा केली. आता आजच्या बैठकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून आणण्यासाठीची एकत्रित रणनिती आखली जाणार आहे.

भाजप आमदारांची उद्या बैठक

महाविकास आघाडीसोबतच भाजपने सुद्धा आपल्या आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. भाजप आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली असून भाजपची उद्या, बुधवारी बैठक होत आहे. भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com