Rajya Sabha Election : “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार”; अनिल बोंडेंचे सूचक विधान

Rajya Sabha Election : “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार”; अनिल बोंडेंचे सूचक विधान

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे...

या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकमेकांवर केला. दरम्यान यावेळी भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मोठे विधान केले आहे.

यावेळी बोलतांना अनिल बोंडे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे (bjp) उमेदवार १०० टक्के विजयी होतील. तसेच आमच्या मनात अजिबात कुठलीही धाकधूक नसून महाभारतात (Mahabharat) ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असे विधानही त्यांनी केले. तसेच संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, शिवसेनेकडून (shivsena) राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार (Sanjay Raut & Sanjay Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com