Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रावर अन्याय : राज्याला ७.५ लाख तर गुजरातला ४० लाख लसींचे...

महाराष्ट्रावर अन्याय : राज्याला ७.५ लाख तर गुजरातला ४० लाख लसींचे डोस

“गुजरातपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट आहे. महाराष्ट्रात आज साडेचार लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये आजच्या घडीला फक्त १७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक केला जात आहे. महाराष्ट्राला ७.५ लाख लसीचे डोस दिले आहे तर गुजरातला ४० लाख लसीचे डोस दिले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. “ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झाले आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत”, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यासोबतच, त्यांनी राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊन मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कसं कमी आहे, त्याविषयी देखील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- Advertisement -

आठवड्याला ४० लाख डोस द्या

“केंद्र सरकार राज्याला लसीच्या पुरवठ्यासंदर्भात मदत करत आहे. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्यापद्धतीनं पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

८ वर्षावरील सर्वांना लस द्या

“अमेरिकेसारख्या विकसित देशांनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपणही याची सुरुवात करायला हवी कारण हाच वयोगट सर्वाधिक बाहेर फिरणारा आहे. इतर देशांना लस पुरवली पाहिजे पण सध्या आपल्या देशाला सर्वाधिक गरज आहे. तर याची काळजी घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्रानं करायला हवी”, अशी मागणी राजेश टोपे यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या