अखेर आरोग्य विभागाच्या परीक्षेची फायनल तारीख जाहीर

अखेर आरोग्य विभागाच्या परीक्षेची फायनल तारीख जाहीर
राजेश टोपे

मुंबई | Mumbai

आरोग्य विभागातील (health department)गट क आणि गट ड प्रवर्गातील परीक्षा (examination)अचानक स्थगित करण्यात आली होती. ऐनवेळी परीक्षा रद्द (maharashtra medical exam) करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (students) रोषाची भावना आहे.

दरम्यान या संदर्भात आज दुपारी २ ते ३ तास बैठक झाली. त्यामध्ये २४ ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.