राजस्थान षडयंत्र: २५-३५ काेटीत आमदारांची खरेदी
मुख्य बातम्या

राजस्थान षडयंत्र: २५-३५ काेटीत आमदारांची खरेदी

पायलेट समर्थक दाेन आमदारांची पक्षातून हाकालपट्टी

jitendra zavar

jitendra zavar

राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलेट यांनी आपण पक्षात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे त्यांचे समर्थक असलेल्या दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जयपूरमधील संजय जैन यांच्या मार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात असल्याचा दावा आहे.

काँग्रेसने ऑडिओ क्लिपची दखल घेतली पायलेट समर्थक आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचे काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. काँग्रेस ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आले आहे. २५ ते ३५ काेटीत आमदारांची खरेदी हाेत असून त्यात भाजपचा हात असल्याचा आराेप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजवाला यांनी केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com