Accident News : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली; चौघे ठार

Accident News : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली; चौघे ठार

दौसा | Dausa

चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ही घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जात होती. या बसमध्ये ४० हून अधिक प्रवास करत होते. दरम्यान, रविवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग-२१ वरील पुलाजवळ बस आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.

बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २४हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ४ प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्या, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे. रेल्वे नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती मिळताच जयपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या भीषण अपघातामुळं घटनास्थळी बराच वेळ गोंधलाचे वातावरण होते.पोलिसांनी मृतांचा ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com