राजस्थान : भाजपने विचारले ‘हे’ सहा प्रश्न
मुख्य बातम्या

राजस्थान : भाजपने विचारले ‘हे’ सहा प्रश्न

सीबीआय चाैकशी करण्याची भाजपची मागणी

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली: New delhi

राजस्थानमधील गहलोत सरकारवर घोंघावत असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच अधिकतपणे भाष्य केले आहे. भाजपने काँग्रेसला ६ प्रश्न विचारले आहेत. राजस्थानातील परिस्थितीवर भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नावर तत्काळ सीबीआय (CBI) चाैकशी करण्याची मागणीही भाजपने केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत राजस्थानातील राजकीय स्थितीवर भाष्य करत काँग्रेसवर टीकेची झाेड उठवली. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला ६ प्रश्न विचारले.

१) राजस्थान सरकारने राज्यातील आमदार आणि राजकीय व्यक्तींचे फोन टॅप अधिकृतपणे केले आहे का?

२) फाेन टॅपिंग अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीर मुद्दा नाही का?

३) फाेन टॅपिंगसाठी नियमांचे पालन केले गेले का?

४) राजस्थानातील अप्रत्यक्षपद्धतीने अाणीबाणी लागू करण्यात आली आहे का?

५) राजस्थानातील सर्वच पक्षांमधील राजकीय व्यक्तींचे फोन टॅप केले जात आहेत का

६) गहलाेत सरकार स्वत:ला वाचवण्यासाठी फाेन टॅपिंगचा मुद्दा समाेर आणत आहे का?

राजस्थानातील परिस्थितीस भाजप जबाबदार असल्याचा आरोप चुकीचा असून राजस्थानातील परिस्थिती ही काँग्रेसमुळेच निर्माण झालेली आहे असे सांगतानाच, काँग्रेसमधील लोकांनीच राजस्थानातील गहलोत सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com