Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या"...तर बरं झालं असतं"; नव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

“…तर बरं झालं असतं”; नव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे (Sansad Bhavan Inaugaration) आज उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळा देखील अवघ्या देशातील जनतेने पाहिला. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक बड्या नेत्यांना यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.

विरोधकांचा बहिष्कार आणि टिका

नवीन संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. देशभरातील २० पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यात प्रामुख्याने, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह २० पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे

“त्यांची भाषा त्यांनाच शोभते त्यावर…”; शिंदेंच्या ‘जमालगोटा’ वक्तव्यावर पवारांची प्रतिक्रिया

बहुतांश विरोधी पक्षांची मागणी होती की, हा इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं. तर काही विरोधी पक्षांनी भूमिका मांडली की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमातीचं उद्घाटन करायला हवं होतं, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना साधं निमंत्रणही दिलं नव्हतं. त्यामुळे विरोधी पक्षांकडून या सोहळ्याला जोरदार विरोध होत होता. परंतु विरोधी पक्षांच्या मागणीला, त्यांच्या विरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही.

त्याआधी, पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ देखील बसवला. संसद भवनाच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदी नवीन संसदेच्या आत लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी एक विशेष स्मारक टपाल तिकीट आणि ७५ रुपयांचे नाणे देखील जारी केले.

पंतप्रधान संसदेच्या उदघाटनाला राज्याभिषेक समजताहेत; राहुल गांधींचा खोचक टोला

दरम्यान, सरकारच्या समर्थनार्थ २५ पक्ष आले आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये फुट पडली आहे. हे सर्व पक्ष उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहे. यामध्ये एनडीएमधील पक्षांसोबत इतर पक्षही आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या