
मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी ( Rebel Eknath Shinde ) केली आहे. ठाकरे सरकार धोक्यात ( Thackeray government crisis ) आले असून, शिंदे गटाला शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.
राज्यात एकीकडे शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करत त्यांनी आपल्या शस्त्रक्रियेबाबत महत्वाची माहिती दिली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना आपण आता घरी परतलो आहोत, असे राज ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज यांच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. पाय दुखण्याचा त्रास त्यांना सुरू झाला होता. राज ठाकरे यांच्यावर सुरूवातील १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. करोना डेड सेलमुळे त्यांच्यावर नियोजित दिवशी शस्त्रक्रिया झाली नाही. पण नंतर योग्य ती खबरदारी व विश्रांती घेऊन राज सोमवारी लिलावती रूग्णालयात दाखल झाले आणि त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.