Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर वाद आणि नोटबंदीवरून राज ठाकरेंनी भाजपला सुनावलं; म्हणाले...

त्र्यंबकेश्वर वाद आणि नोटबंदीवरून राज ठाकरेंनी भाजपला सुनावलं; म्हणाले…

नाशिक | Nashik

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शुक्रवारपासून (दि.१९) तीन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून काल संध्याकाळच्या सुमारास त्यांचे नाशकात आगमन झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन बळकट करण्याकरता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. अशातच राज ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे…

- Advertisement -

यावेळी राज ठाकरेंनी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बाजारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिले नव्हते. हे असले निर्णय परवडणारे नसतात असे म्हणत त्यांनी एकप्रमाणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. तसेच आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असे सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, खर्गेंच्या लेकासह ‘हे’ ८ आमदार बनणार मंत्री

तसेच राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे १३ मे रोजी घडलेल्या घटनेवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “वर्षानुवर्षे जर तिथली प्रथा असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आणि मशिदी आहेत, त्याठिकाणी हिंदू मस्लिम एकोप्याने राहतात. माहिम मधील उरूसाला माहिम पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो, जर इतर धर्माचा माणूस मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा कमकुवत धर्म आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच मी देखील अनेक दर्ग्यात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिराचा (Trimbakeshwar Temple) निर्णय गावकऱ्यांनी घ्यायचा आहे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या