Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या‌उध्दव ठाकरे फक्त टीव्हीवरच दिसले

‌उध्दव ठाकरे फक्त टीव्हीवरच दिसले

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल मी काही बोलणार नाही,” अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी सत्तेवर आली. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरे यांनी करोनाची परिस्थिती उत्तम हाताळली, असे कौतुक एका संस्थेने केले. देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीतही उद्धव यांचा समावेश झाला होता. त्या अनुषंगाने राज यांना प्रश्न विचारला. त्यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला.

ते म्हणाले, ’करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे. सरकारचे निर्बंध, टीव्हीवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसमुळे यात भर पडत आहे. काळजी घेणे आवश्यक आहे, पण घरात बसून राहणेही चुकीचे आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग-व्यवसाय बुडाले आहेत.असेही राज म्हणाले.

दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मास्क घातला नव्हता. त्याबद्दलची आठवणही त्यांनी सांगितली. राज म्हणाले, त्या बैठकीनंतर मी मास्क वापरला नाही. त्यावेळी मला प्रश्न विचारणाऱ्या आणि मास्क घालून वावरणाऱ्या पत्रकारांपैकी ५५ जणांना करोनाची लागण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या