
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी, सह्याद्री व भुभागावर पश्चिमेकडून झेपवणारे समुद्री वारे तसेच केरळ, कर्नाटकात होत असलेला जोरदार पाऊस यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची (Rain) शक्यता आहे....
विशेषतः दि. २०, २१ व २२ रोजी संपूर्ण कोकणासहित (Kokan) सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे...
खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण असुन पाऊसही पडणार आहे. चांगल्या ओलीवर नक्कीच पेरण्या होवु शकतात. फक्त शेतकऱ्यांनी संयम ठेवून धुळपेरण्या करू नये. असे आवाहन त्यांनी केले आहे.