नाशिकसह 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार

नाशिकसह 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार

मुंबई । Mumbai

जून महिन्यात (june month) गायब झालेल्या मान्सूनने (monsoon rain) जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. तसेच मुंबईत कालपासून पावसाची (Mumbai Rains) संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच आता नाशिकसह (Nashik) देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केली आहे...

हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी ट्विटरवरुन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याची माहिती दिली असून होसाळीकर यांनी पश्चिम किनारपट्टीचे उपग्रहांच्या माध्यमातून काढलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत होसाळीकर यांनी किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ५ जुलै, सकाळी साडे नऊ वाजताची ही परिस्थिती असून पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा तर काही निवडक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच होसाळीकरांनी पुढे प्रदेशांची नावे घेऊन या परिस्थितीचा परिणाम नेमका कोणत्या प्रदेशांवर होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट या भागांमध्ये या परिस्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com