IMD : उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार

पाऊस
पाऊस

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने (imd)वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे. ( Rain) नाशिक, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पाऊस पडत आहे. नाशिक(nashik), नगर(nagar), धुळे(dhule), नंदुरबारात (nandurbar) आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर जळगाव व नगरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र उद्यापासून (गुरुवार) महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशाराही दिला आहे.

पाऊस
मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...

उत्तर महाराष्ट्रात १ डिसेंबर रोजी नाशिक(nashik), नगर(nagar), धुळे(dhule), नंदुरबारात (nandurbar) आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर जळगाव व नगरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र २ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत पाच ही जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही.

दरम्यान, काल हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील पालघर, नंदुरबार धुळे या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. (Maharashtra Rain)त्यामुळे या प्रदेशातील ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे भारतीय हवामान खात्याने किनारपट्टीवरील लोकांना आणि मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आज सकाळपासून मुंबईध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे.

येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामद्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com