Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

मुंबई | Mumbai

एकीकडे गणपती बाप्पाचे (Ganapati Bappa) आज आगमन होत असून सगळीकडे गणेशभक्त घरोघरी जल्लोषात बाप्पाचे स्वागत करत आहेत. तर दुसरीकडे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी देखील राज्यातील विविध भागांत पाऊस (Rain) हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांवर आलेले पाणी संकट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगांची जमावट होत आहे. परिणामी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार
Ganeshotsav 2023 : गणपती माझा नाचत आला! राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, बाप्पाचे जल्लोषात स्वागत

त्यानुसार आज हवामान विभागाने राज्यातील ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर उद्यापासून विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या (Farmers) आशा पल्लवीत झाल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार
New Parliament : नव्या संसदेचा आजपासून 'श्रीगणेशा', खासदारांना मिळणार खास गिफ्ट
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com