निफाड -औरंगाबाद महामार्गाला नदीचे रूप

निफाड -औरंगाबाद महामार्गाला नदीचे रूप

निफाड | प्रतिनिधी Niphad

निफाड -औरंगाबाद रस्त्यावर ( Niphad Aurangabd Road ) थोडा जरी पाऊस झाला तरी एक बाजूने पूर्णपणे पाणी साचून रस्ता दुतर्फा ऐवजी एकतर्फी होतो. अनेक वेळा पीडब्ल्यूडी तसेच नगरपंचायतला तक्रार करून देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटारी आजपर्यंत देखील जैसेथे परिस्थितीत आहे.

निफाड औरंगाबाद हायवेवर अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करतात पण सदर व्यवसाय करताना नियमानुसार आपल्या व्यवसायाकडे येणाऱ्या ग्राहकांना सोय म्हणून गटारीच्या ठिकाणी पाईप टाकून व्यवस्था केली पाहिजे परंतु निफाड औरंगाबाद रोडवर अशी कुठलीच व्यवस्था या रोडवर दिसत नाही. पंधरा-वीस मिनिटे जरी पाऊस चालू झाला तरी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते.

शांतीनगर चौफुली ची देखील यापेक्षा वेगळी अवस्था नाही सर्व गावाचे पाणी शांतीनगर चौफुल्यावर येऊन गोळा होते त्याची देखील सांडपाणी व्यवस्था नगरपंचायत मार्फत गेल्या सात आठ वर्षात करण्यात आलेली नाही.

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करोडो रुपये खर्च रस्ता बनवतात परंतु किरकोळ हलगर्जीपणा मुळे हे करोडो रुपये अक्षरशः पाण्यात जातात. बँकेसमोरील खड्डा गेल्या सात वर्षात कमीत कमी दोनशे वेळा बुजवण्यात आला पर्यंत पावसात देखील परत अर्धा ते एक फुटाचा खड्डा लागली त्या रस्त्याला पडतो असे असून देखील पीडब्ल्यूडी व नगरपंचायत आपत्ती व्यवस्थापन झोपेचे सोंग घेऊन सगळे बघत आहे.

निफाड नगरपंचायतने डीपी प्लॅन तयार करायला घेतलाआहे. अनेक विषय त्या मध्ये मांडण्यात आले डम्पिंग ग्राउंड असेल व्यापारी संकुल हॉस्पिटल कॉलेज क्रीडांगण असे असे अनेक प्रश्नांवर काल चर्चा झाली परंतु सांडपाण्याचा नियोजन हा विषय काल कोणीही मांडला नाही याचं दुःख आहे निफाड औरंगाबाद रस्त्याप्रमाणेच सर्व शहराला जोडणार रस्त्यांचे हेच हाल बघावयास मिळतात हॅपी बर्थडे योजनेतून झालेल्या रोडच्या गटारीचा विषय प्रलंबित असून त्यावर कोणीही शब्द देखील काढण्यास तयार नाही.

एकाही रस्त्याला सांडपाण्याच्या गटाऱ्यांची व्यवस्था आज पावेतो नाही. नगराध्यक्ष आपल्या दारी ही योजना फक्त फोटो पुरतीच मर्यादित राहिलेली दिसते तरी या विषयाकडे आज नगरपंचायत अथवा पीडब्ल्यूडी यांनी लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड यामुळे द्यावे लागत आहे तरी याची लवकरात लवकर दखल घेऊन निफाड औरंगाबाद रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी या लवकरात लवकर करण्यात येऊन सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी. यावर लवकरात लवकर निर्णयांना झाल्यास भारतीय जनता पार्टी निफाड शहराच्या वतीने नगरपंचायत व पीडब्ल्यूडी अधिकारी यांना निफाड शहराच्या वतीने घेराव घालण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com