Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रहवामान विभागाचा अंदाज : पावसाची आठवडाभर विश्रांती

हवामान विभागाचा अंदाज : पावसाची आठवडाभर विश्रांती

पुणे

राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवेश होत असताना कोकण विभागासह सर्वच भागांत जोरदार बरसणारा पाऊस सध्या थांबला आहे. राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर अत्यंत कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उसंत घेतलेली आहे. सध्या मोसमी वारे राज्यभर सक्रिय आहेत, कमी दाबाचे पट्टेही निर्माण होत आहेत, पण अनेक भागांत पाऊस थांबला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी आणि मोसमी पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांची काम हाती घेतली होती.अनेक भागांत पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाला असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, तीन ते चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद, विदर्भातील अकोला आदी जिल्ह्य़ांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही.

राज्यात सध्या मोसमी वारे सक्रीय असले तरीही सहारा भागामधून येणाऱ्या धुळीच्या कणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक वातावरण राज्यात नाही. यामुळेच राज्यात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

सहारा भागातून हवेच्या वरच्या भागात येणाऱ्या धूलिकणांमुळे ढगांची निर्मिती होत नाही. ढगांची निर्मिती झाली तरी त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे ते पाऊस देत नाहीत. हीपरिणामी पाऊस कमी किंवा गायब झाला आहे. २० ते २१ जूनपर्यंत प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होईल.

जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

- Advertisment -

ताज्या बातम्या