Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ

Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुलै महिन्यात (July Month) विक्रमी मान्सून (Monsoon) बरसल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र नाशिक शहरात आज पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

आज सकाळपासून उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला आहे.

येत्या शुक्रवार (दि ०५) पासून अपेक्षित असलेल्या मान्सूनची सक्रियता कदाचित एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवार (दि.४) पासूनच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाने सुरवात होवु शकते.

Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ
उद्धव ठाकरे गटाला 'सर्वोच्च' धक्का; 'ती' मागणी फेटाळली

विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील (south maharashtra) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चांदा, गडचिरोली या १० जिल्ह्यात २४ तास आधीपासूनच मान्सून सक्रीय झालेला बघायला मिळेल, असा इशारा निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिला होता. आज नाशिकसह अन्य भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ
सत्तासंघर्षाबाबत पुढील सुनावणी ८ ऑगस्टला; काय घडले आज कोर्टात?

समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात ३ किमी ते ७ किमी अंतरादरम्यान मंगळूर, बंगळूर, व चेन्नई या शहरावरून जाणारा पूर्व-पश्चिम एकमेकांविरुद्ध समांतर जाणारा वाऱ्याचा शिअर झोन अधिक अक्षवृत्तीय अंतरावरील उत्तरेकडे म्हणजे गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील शहरावरून येत्या ३-४ दिवसात शिफ्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Photo Gallery : नाशकात श्रावणसरी; अचानक आलेल्या पावसाने तारांबळ
देशाच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा मराठी माणूस; 'हे' नाव चर्चेत
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com