नाशिकमध्ये जोर'धार'; सकाळपासून झाला इतका पाऊस

गोदावरीला गटारीच्या पाण्याचा पूर; पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला रोष

नाशिक | प्रतिनिधी Nashik

संपूर्ण जून महिनाभर आणि जुलैचा पहिला आठवडा पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना आज झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनंतर (Orange Alert) नाशिकसह परिसरात (Nashik Area) पावसाने रात्रीपासूनच जोर धरला आहे. सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु आहे.... (Heavy rain in nashik)

नाशिकमध्ये जोर'धार'; सकाळपासून झाला इतका पाऊस
सुरगाण्यात धुव्वाधार, नद्या-नाले तुडुंब; पाहा व्हिडीओ

प्राप्त माहितीनुसार, ३९.८ मिलीमीटर पावसाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. (39.8 mm rain from morning to afternoon in nashik) नेहमीप्रमाणेच पहिल्या पावसात गटारीच्या पाण्याचा पूर गोदावरीला (Flood in godavari river) आलेला दिसून आला. स्मार्ट फरशा गोदातीरी (godavari river side) बसविण्यात आल्यामुळे येथील पात्र पाच ते सहा इंचांनी वाढले उंच झाले आहे. 'तुम्ही शेकडो कोटी खर्च करा पण ग्राउंडवर झिरो रिझल्ट, तोच बर का नेहमीचा पावसाळ्यातील गोदावरीला आलेला पहिला गटारीचा पूर' असे म्हणत पर्यावरणप्रेमींनी स्मार्ट सिटी कंपनीवर (Smart city company) पुन्हा एकदा रोष व्यक्त केला.

संपूर्ण नाशिक शहरात (Nashik city) आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. संततधार पावसामुळे मोठी तारांबळ उडाली आहे. सकाळी कामावर पोहोचणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. तसेच शाळा आणि महाविद्यालये सध्या सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील आज पावसात भिजत मार्गस्थ व्हावे लागले.

नाशिकमध्ये जोर'धार'; सकाळपासून झाला इतका पाऊस
बरसो रे मेघा मेघा...! नाशकात पावसाची संततधार

एकीकडे पावसाची संततधार सुरु असताना गोदाकाठी असलेल्या चेम्बर्सचे ढापे उघडल्यामुळे हजारो लिटर गटारीचे पाणी गोदावरीत मिसळले. यामुळे परिसरातदुर्गंधी पसरली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com