नाशिकमध्ये पावसाची हजेरी
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये पावसाची हजेरी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वरुणराजाने आज नाशिक शहरात हजेरी लावली. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दुपारच्या पावसाने दिलासा दिला. दुपारी पावणेतीनच्या सुरु झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले.

अर्धा तास चाललेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शहरातील काही भागात सकाळीदेखील तुरळक पावसाच्या सरी कोसळण्सयास सुरुवात झाली होती.

नाशिकमधील सिडको, पंचवटी, नाशिकरोड भागांत जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडालेली दिसली. तर आडगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील कसमादेसह परिसरात अनेक भागात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र, इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com