Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाची खबरबात; हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट

पावसाची खबरबात; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीने चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाकडून (IMD) उद्याही राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) जोरदार बरसत आहे. अशातच हवामान विभागाने उद्याही २४ तासांसाठी पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेत्याची निवड कधी? ; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये तयारीत राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, नगर, जालना, नगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही.

यासोबतच, २४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. तर उर्वरीत मुंबई, नाशिक, पुणे, बुलडाणा, परभणी, नांदेडसह उर्वरित संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर २५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर आणि धाराशीव या जिल्ह्यांना कुठलाही इशारा नाही पण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे उर्वित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मणिपूर घटनेची पुनरावृत्ती ; दोन महिलांना विवस्र करत केली बेदम मारहाण

दरम्यान, आज सकाळपासूनच सुरू असलेलया मुसळधार पावसामुळे बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून तेथील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही वर्षात यवतमाळ शहरात पहिल्यांदाच अनेक भागात पाणी साचले आहे. शहरातील अनेक भागात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या