IMD : राज्यात पुन्हा दोन दिवस पाऊस

IMD : राज्यात पुन्हा दोन दिवस पाऊस

गेल्या वर्षभरात पावसाळ्यासह इतर ऋतुमध्ये अवकाळी पावसाने दणका दिला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील इतर राज्यांनाही या पावसामुळे मोठा फटकाही बसला.राज्यातील अनेक भागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. शनिवारी, रविवारी (ता.२२ व २३) मेघगर्जनेसह हलक्या सरी बरसू शकतात, अशी शक्यता हवामान खात्याने (IMD)वर्तवली आहे.

IMD : राज्यात पुन्हा दोन दिवस पाऊस
आबांच्या मुलाने करुन दाखवले : म्हणाला होता, निकालावेळी माझ्या बापाची आठवण येईल

एका बाजुला थंडीची लाट (Cold Wave) आणि दुसऱ्या बाजुला पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने (IMD) देशातील काही राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रात २२ आणि २३ जानेवारीला काही भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून पुढचे दोन दिवस पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

IMD : राज्यात पुन्हा दोन दिवस पाऊस
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

का पडणार पाऊस

नैऋत्य राजस्थानजवळ पुन्हा वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यासह देशातील काही भागांत पाऊस पडू शकतो. या बदलांमुळे मुंबईचे रात्रीचे तापमान देखील गेल्या काही दिवसांपासून घसरत आहे. बुधवारी रात्री मुंबई किमान तापमान कुलाबा वेधशाळेने 20 अंश सेल्सियस तर सांताक्रूझ वेधशाळेने 17.3 अंश सेल्सियस नोंदवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com