Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात श्रावणसरींचा अभिषेक, 'वाचा' कोणत्या धरणातून होतोय किती विसर्ग?

नाशकात श्रावणसरींचा अभिषेक, ‘वाचा’ कोणत्या धरणातून होतोय किती विसर्ग?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात गेल्या काही दिवसांपासून श्रावणसरींचा अभिषेक सुरु आहे. कधी जोरदार तर कधी सततच्या रिमझीम पावसाने परिसर ओलेचिंब झाले आहे….

- Advertisement -

आज सकाळपासून शहरात तसेच जिल्ह्याच्या काही भागात पाऊस बरसत आहे. आज सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यातच जोरदार पाऊस बरसल्याने हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. यामुळे नागरिकांना दुचाकी चालवण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.

तसेच औरंगाबाद नाक्याकडून द्वारका परिसरात जाणारा रस्ता सततच्या पावसामुळे निसरडा झाला आहे. या रस्त्यावर अनेकदा दुचाकीचालकांचे अपघात होत आहेत. रस्ता निसरडा झाल्यामुळे दुचाकी मोठ्या प्रमाणात स्लीप होतात. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सध्या दारणा धरणातून ५ हजार ७०८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर मुकणे धरणातून ९२९ क्युसेसने पाणी सुरु आहे. कादवा धरणातून १ हजार १६५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

शेतकरी एकवटले, कांदा विक्री बंद आंदोलन होणारच

वालदेवी धरणातून १८३ तर आळंदीमधून ३० क्युसेसने पाणी सुरु आहे. होळकर पुलाखालून २७८ क्युसेस पाणी सुरु असून भोजपूरमधून १९० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.

‘अब हर देश में तिरंगा’…; कझाकस्तानमध्ये एकाच वेळी झाले नाशिकचे १९ ‘आयर्नमॅन’

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु राहिला तर गंगापूरमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून १५ हजार ६१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर पालखेड धरणातून ५ हजार ८८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या