रेल्वेला 391.43 कोटींची कमाई

झिरो स्क्रॅप मिशन; भंगार मालाची विल्हेवाट
रेल्वेला 391.43 कोटींची कमाई

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

मध्य रेल्वेमधील (Central Railway) प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप मिशन (Zero scrap mission) सुरू केले आहे...

करोना (Corona) महामारी असूनही मध्य रेल्वेने 2020-21 या वर्षात 350 कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि 391.43 कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक आहे. लिलावाच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते. वर्ष 2021-22 चे लक्ष्य 400 कोटी रूपये आहे.

या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे साहित्य, निरूपयोगी (भंगार) डबे, वॅगन आणि इंजीन (लोकोमोटिव्ह) इत्यादींचा समावेश आहे. मध्य रेल्वेने 8.65 कोटी रुपयांच्या कमाईसह ई-ऑक्शनद्वारे जसे आहे तिथे आहे तत्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल.

या आर्थिक वर्षात रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचार, काळजीसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याबरोबरच रेल्वे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यात साहित्य व्यवस्थापन शाखेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com