अनारक्षित रेल्वेसेवा पूर्ववत

कमी तिकीटदरात प्रवाससंधी; प्रवाशांना दिलासा
अनारक्षित रेल्वेसेवा पूर्ववत

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

रेल्वे मंत्रालयाने Ministry of Railways काही आरक्षित गाड्यांचे आरक्षण हटवून By removing the reservation of reserved trains त्या नेहमीप्रमाणेच साध्या गाड्या म्हणून चालविण्याचे घोषित केले होते. भुसावळ-खंडवा, बडनेरा-नरखेड, नागपूर-आमला, आमला-इटारसी, अमरावती-बडनेरा आणि आमला-छिंदवाडा दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी तिकीट दरात प्रवास करता येणार आहे.

सर्व अनारक्षित मेमू 8 डब्ब्यांसह चालविण्यात येतील. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे-

भुसावळ-इटारसी ट्रेन क्रमांक 01183 15 नोव्हेंबरपासून भुसावळ येथून दररोज 20.40 वाजता सुटेल आणि इटारसी येथे दुसर्‍या दिवशी 06.05 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01184 19 नोव्हेंबरपासून इटारसी येथून दररोज 19.30 वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसर्‍या दिवशी 04.25 वाजता पोहोचेल.

भुसावळ-बडनेरा 2 ट्रेन क्रमांक 01365 दि.15 नोव्हेंबरपासून भुसावळ येथून दररोज 06.30 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01366 दि.17 नोव्हेंबरपासून बडनेरा येथून दररोज 13.30 वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी 18.55 वाजता पोहोचेल. बडनेरा-नरखेड- ट्रेन क्रमांक 01367 15 नोव्हेंबरपासून बडनेरा येथून दररोज 13.05 वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी 16.15 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्र. 01368 दि. 15 नोव्हेंबरपासून 17.00 वाजता नरखेड येथून सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी 20.35 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01369 16 नोव्हेंबरपासून बडनेरा येथून दररोज 05.50 वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी रात्री 08.55 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01370 16 नोव्हेंबरपासून नरखेड येथून दररोज 09.30 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे 13.00 वाजता पोहोचेल.

नागपूर- आमला- ट्रेन क्रमांक 01323 दि. 18 नोव्हेंबरपासून नागपूर येथून दररोज 18.05 वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी 22.20 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01324 दि. 18 नोव्हेंबरपासून आमला येथून दररोज 04.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 09.10 वाजता पोहोचेल. आमला-इटारसी- ट्रेन क्रमांक 01317 दि. 19 नोव्हेंबरपासून आमला येथून दररोज 08.00 वाजता सुटेल आणि इटारसी येथे त्याच दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01318 16 नोव्हेंरपासून इटारसी येथून 12.20 वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी 16.00 वाजता पोहोचेल.

अमरावती-वर्धा-ट्रेन क्रमांक 01371 दि. 16 नोव्हेंबरपासून अमरावती येथून दररोज 15.15 वाजता सुटेल आणि वर्धा येथे त्याच दिवशी 17.10 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01372 17 नोव्हेंबरपासून वर्धा येथून दररोज 10.00 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 12.10 वाजता पोहोचेल.

आमला-छिंदवाडा- ट्रेन क्रमांक 01319 दि. 17 नोव्हेंबरपासून आमला येथून दररोज 08.00 वाजता सुटेल आणि छिंदवाडा येथे त्याच दिवशी 11.15 वाजता छिंदवाडा येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01320 दि. 17 नोव्हेंबरपासून छिंदवाडा येथून 18.15 वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी 21.20 वाजता पोहोचेल.

बडनेरा-अमरावती- ट्रेन क्रमांक 01379 16 नोव्हेंबरपासून बडनेरा येथून दररोज 14.10 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 14.30 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01380 दि. 17 नोव्हेंबरपासून अमरावती येथून 13.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.25 वाजता बडनेरा येथे पोहोचेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com